महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी एक अभिनव संकल्पना मांडली आहे, त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीतांवर कवायती (शारीरिक व्यायाम) करून घेतल्या जाणार आहेत.