पंतप्रधान नरेंद्र मोदींची चिमूरमध्ये जाहीर सभा झाली आणि त्यात त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. विकास कामांना स्थगिती देण्यात महाविकास आघाडीची पीएचडी झाल्याचं त्यांनी म्हटलं तर आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खिलाडी असल्याचा देखील टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला.