राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा मतदारचोरीचा आरोप केला. कर्नाटकातल्या मतदारसंघात मतदारांची नावं कशी डिलीट झाली, त्याचं प्रेझेंटेशन राहुल गांधींनी दिलं.तर नावं रद्द करण्यासाठीचे अर्ज पहाटे चार वाजता करण्यात आले, असा आरोपही राहुल गांधींनी केला.राहुल गांधींचे हे सगळे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळलेत. मात्र राहुल गांधी आज हायड्रोजन बॉम्ब टाकणार असं सांगण्यात येत होतं.तो हायड्रोजन बॉम्ब काही राहुल गांधींनी आज फोडलाच नाही.