ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांच्या लेटर बॉम्बमुळे मविआत मोठी खळबळ उडालीय.. संजय राऊतांनी थेट दिल्लीतल्या काँग्रेस पक्ष नेतृत्त्वाला पत्र लिहिलंय. यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी तक्रार केलीय. हर्षवर्धन सपकाळ यांनी याआधीच मनसेसोबत कोणतीही आघाडी नको, अशी ठाम भूमिका घेतलीय. राज ठाकरे यांच्याबाबत चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, राऊतांनी थेट दिल्लीत पत्र पाठवल्यानं काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटलाय..