भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. सावंतवाडी, रत्नागिरी उत्तर आणि दक्षिण जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत चव्हाण यांनी बूथस्तरापर्यंत संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच कणकवली आणि रत्नागिरी येथे उभारल्या जात असलेल्या ‘भाजपा भवन’च्या कामांचीही त्यांनी पाहणी केली.