संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरून गेला होता. यानंतर बीडमधील अनेक गुन्हेगारीच्या घटनांचे व्हिडिओ समोर आले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. बीडमधील आष्टी तालुक्यात एका 25 वर्षीय तरुणाला दोन दिवस एका खोलीत बंद करून जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.