शिर्डीत साईबाबांना प्रभु रामचंद्र स्वरुप मानत नतमस्तक होताना भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय.साई मंदिरात साजरा होणा-या तीन दिवसाच्या रामनवमी उत्सवाचा आज मुख्यदिवस आहे.आज दुपारी बारा वाजता साई समाधी मंदिरासमोर चांदीच्या पाळण्यातून रामलल्लाचा जन्म सोहळा पार पडेल.त्यानंतर साईंची मध्यान्ह आरती होईल.. आज साईंच मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय.उत्सवाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी