Shivsena | शिक्षक, पदवीधरसाठी शिंदेसेनेची स्वतंत्र मोर्चेबांधणी? काय म्हणाले Eknath Shinde?

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येतेय.. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरु केल्याचं समोर येतंय. याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हाप्रमुखांची तसंच मंत्री आणि आमदारांची बैठक नुकतीच पार पडली.. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर इतल्या पदवीधर आणि पुणे अमरावती शिक्षक मतदार निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. निवडणुका युतीत तर युतीमध्ये किंवा मग स्वतंत्र तयारीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळतेय.. रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये महायुती एकत्र निवडणुका लढवतील अशी आशाही धुसर असल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली.

संबंधित व्हिडीओ