#eknathshinde #operationsindoor #chandraharpatil भारतीय जवानांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी 'सिंदूर महारक्तदान शिबीर' आयोजित करण्यात आले आहे.सांगली जिल्ह्यातून सुमारे 1000 पैलवान आणि माजी सैनिक या शिबिरात सहभागी होण्यासाठी श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्वजण भारतीय सैनिकांसाठी रक्तदान करणार आहेत. हे 'सिंदूर महारक्तदान शिबीर' डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.