परभणीत पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणीचा मुद्दा राज्यभर गाजला होता. सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झाला नसल्याचं सरकारने पहिल्यांदा सांगितलं होतं. परंतू न्यायालयीन अहवालानुसार सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलीस मारहाणीनेच झाल्याचं समोर आलं आहे. यावर आता विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे.