मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमधील विषारी दारूकांडाची पुनरावृत्ती झालीय.मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात विषारी दारूमुळे किमान १५ जणांचा मृत्यू झालाय.तर तब्बल ४०हून अधिक नागरिक जखमी झालेत त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत ३० पैकी १४ आरोपींना अटक केलीय.इतर आरोपींचा शोध घेतला जातोय. दुसरीकडे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.तसंच विषारी दारू प्रकरणात राज्य सरकारचा यावर कठोर असून त्यात जन्मठेपेसारख्या कठोर शिक्षेची तरतूद आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे कारवाईच्या सूचना दिल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली.