राज्याचा साखर हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. गेल्या काही दिवसात साखरेच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कारखानदार आणि शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.