सांगलीच्या मिरजमध्ये संतप्त आंदोलकांनी उचललं टोकाचं पाऊल, उसाने भरलेला ट्रॅक्टर दिला पेटवून

सांगलीच्या मिरजमध्ये संतप्त आंदोलकांनी उचललं टोकाचं पाऊल, उसाने भरलेला ट्रॅक्टर दिला पेटवून In Miraj, Sangli, angry protesters took an extreme step by setting fire to a tractor loaded with sugarcane. उसाला दर जाहीर करावा मगच कारखाने सुरू करावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. हे आंदोलन आता तिर्व होत चालले आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील मोहनराव शिंदे साखर कारखानाच्या ऊस वाहतूक करणारा उसाने भरलेली ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवून दिला आहे. आरग मल्लेवाडी रस्त्यावर रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक सुरू असताना ऊसाने भरलेला ट्रॅक्टर थांबवून पेटवून देण्यात आला आहे. या घटनेने ट्रॅक्टर आणि उसाचे मोठे नुकसान झाले आहे.

संबंधित व्हिडीओ