महाराष्ट्रात भीषण दुष्काळ, आमदार संतोष बांगर यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना थेट इशारा । NDTV

महाराष्ट्रात भीषण दुष्काळ, आमदार संतोष बांगर यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना थेट इशारा । NDTV Severe drought in Maharashtra; MLA Santosh Bangar issues a direct warning to microfinance companies दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास कारवाई केल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी खाजगी सावकार आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिला आहे..एकीकडे पावसाअभावी पिकांचं नुकसान, तर दुसरीकडे आर्थिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे..अशा परिस्थितीत वाहन कर्ज, होम लोन आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी तगादा लावत आहेत.. त्यामुळे शेतकरी हवालदिन झाले असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी त्रास देऊ नका अन्यथा शासनातर्फे कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना आमदार बांगर यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता कर्जवसुलीच्या मुद्द्यावरून सावकार आणि फायनान्स कंपन्यांना आमदार बांगर यांनी दिलेला हा इशारा चर्चेत आला आहे..

संबंधित व्हिडीओ