बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येतेय. शरद पवार गट बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं पक्षातल्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं. गेल्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी बारामतीतून अजित पवारांविरोधात निवडणूक लढवली होती. 23 एप्रिल रोजी बारामतीची पोटनिवडणूक होणार असून मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.