आजचा हिरो कोण.... तर त्याचं उत्तर आहे विकास बेद्रे..... हा तोच विकास बेद्रे ज्यानं थ्री इडियटमधल्या रॅन्चोसारखी व्हिडीओ कॉलवरुन डॉक्टरशी बोलून एका महिलेची प्रसूती केली..... रात्री पाऊणची वेळ.... राममंदिर स्टेशन.... जवळपास कुठलीही वैद्यकीय सुविधा नाही.... एखादी अँब्युलन्ससुद्धा नाही... आणि महिलेच्या पोटातून बाळ अर्धं बाहेर आलेलं.... अशा परिस्थितीत विकास बेद्रेला त्या क्षणी जे सुचलं, ते त्यानं केलं..... आणि आज विकास बेद्रे आणि डॉक्टर देविका देशमुख यां दोघांचंही कौतुक होतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं नेमकं कसं घडलं.... याची माहिती विकास आणि डॉक्र देविका यांनी सगळ्यात आधी NDTVमराठीला दिलीय....