राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे पाणी टंचाईची परिस्थिती मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळते. मराठवाड्यातील तीनशे सत्याहत्तर गावांमध्ये पाणी टंचाई असून या गावांना चारशे तेहतीस टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. संभाजीनगरच्या शेंद्रा जलकुंभावरून याच पाणी टंचाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी.