अमेरिकेच्या अध्यक्षांना पुन्हा एकदा नोबेलचे वेध, शांतीप्रक्रियेत अमेरिकेच्या अध्यक्षांनी घेतलं श्रेय

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नोबल शांती पुरस्कार मिळवण्याची तीव्र इच्छा काही केल्या कमी होत नाही.त्याच इच्छेपोटी जगात जिथे जिथे संघर्ष सुरु आहे तिथे तिथे हस्तक्षेप करुन तो थांबवण्याचा ट्रम्प प्रशासन गेले सहा महिने प्रयत्न करतंय.अनेक छोटेमोठे संघर्ष थांबवण्यात त्यांना यश आलंय.अझरबैजान आणि अरमेनिया या बाल्कन प्रांतातील देशांमध्ये गेली तीन दशकं संघर्ष सुरु होता. ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं तो थांबलाय. पण इस्रायल हमास आणि रशिया युक्रेन ही दोन युद्ध थांबविण्याचा वायदा करुन सत्तेत आलेल्या ट्रम्प यांना ते संघर्ष थांबवता आलेलं नाही. त्यामुळे 10 ऑक्टोबरला जाहीर होणाऱ्या नोबेल शांतीपुरस्कारच्या विजेत्याचं नाव ट्रम्प यांचं असेल का याविषयी अद्यापही संभ्रम कायम आहे. पण ट्रम्प यांनी आशा सोडलेली नाही.

संबंधित व्हिडीओ