अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केले आहेत. रशियाकडून स्वस्त कच्चं तेल विकत घेऊन भारत ते खुल्या बाजारात चढ्या दरानं विकतो आणि नफा कमावतो असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. त्यामुळे आता भारतावर आणखी टेरिफ लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. रशियाशी भारताचे घनिष्ठ व्यापारी संबंध आहेत. रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरु झाल्यानंतर भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो. याच आयातीवर बोट ठेवून ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टेरीफ लादण्याचा निर्णय घेतला. आज पुन्हा एकदा तीच री ओढत ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशलववर भारताला पुन्हा एकदा धमकी दिलीय. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुयात ट्रम्प काय म्हणालेत.