Uttarkashi|उत्तराखंडमध्ये ढगफुटीचं थैमान,महाराष्ट्राचे 54 पर्यटक अडकले;पर्यटक सुखरुप घरी कसे परतणार?

उत्तराखंडच्या उत्तरकाशीत महाप्रलय झाला.. पण या प्रलयामुळे महाराष्ट्राचं टेन्शन वाढलंय.. कारण ढगफुटीची घटना घडली तेव्हा महाराष्ट्रातले 54 पर्यटक तिथे अडकल्याची माहिती समोर आलीय.. पुणे, सोलापूर, नांदेड आणि जळगाव या जिल्ह्यांमधले एकूण 54 पर्यटक गंगोत्रीच्या दर्शनासाठी आले होते. मात्र ढगफुटीनंतर सगळ्याच पर्यटकांचा संपर्क तुटला आणि त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली.. या पर्यटकांमध्ये पुण्यातील 24 जण अडकले होते.. विशेष म्हणजे हे 24 जण शाळेच्या रियूनियनसाठी एकत्र आले होते..पण त्यांचा रियूनियनचा अनुभव फारच थरारक राहिलाय.. पाहुयात..

संबंधित व्हिडीओ