Vaishnavi Hagawane Case|लता,शशांक हगवणे,निलेश चव्हाणच्या कोठडीत वाढ होणार? शिवाजीनगर कोर्टात सुनावणी

आज दुपारी लता हगवणे, शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण या तिघांची पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सुनावणी होणार आहे. या अगोदर लता हगवणे आणि शशांक हगवणे यांना जेसीबी प्रकरणात खेड न्यायालयात हजर केले होते.त्याच प्रकरणात चौकशीसाठी म्हाळुंगे MIDC पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.आता या सगळ्यांच्या चौकशी दरम्यान पोलिसांना काय पुरावे मिळाले हे न्यायालयात सादर करून आजची सुनावणी होईल. दरम्यान या प्रकरणात हगवणे कुटुंबीयांना आणि निलेश चव्हाण ला पुन्हा कारागृहात जावे लागणार की त्यांची जामीनावर सुटका होईल याकडे पहावे लागेल.

संबंधित व्हिडीओ