Vidarbha Rain| विदर्भाला पावसाचा तडाखा, पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला; शाळांना सुट्टी | NDTV

नागपूर जिल्ह्यातील भिवापुर तालुक्यात नक्षी नदीला पूर आला आहे.. त्यामुळे भिवापूर - जवळी - हिंगणघाट मार्ग बंद झाला आहे... गेले दोन दिवस नागपुरात पावसाची संततधार सुरू असून गेल्या दोन दिवसात सर्वाधिक पाऊस भिवापूर तालुक्यातच झाला होता.. मात्र पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली नव्हती.. मात्र काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नक्षी नदी ओसंडून वाहत असून नदीचा पाणी जवळपासच्या क्षेत्रामध्ये पसरला आहे.. परिणामी भिवापूर वरून हिंगणघाटकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे...मनीष नगर अंडर ब्रिज पाण्याखाली गेला आहे... नरेंद्र नगर रेल्वे अंडरब्रिज सुद्धा पाण्याखाली गेलाय. गेल्या दोन दिवसापासून प्रादेशिक हवामान खात्याने मुसळधार पावसाचा आणि संततधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार स्थानिक प्रशासनांने उपाययोजना केल्या होत्या. पण काही ठिकाणी पंप्स लावले नसल्याने अंडर ब्रिज मध्ये पाणी जमले आहे.

संबंधित व्हिडीओ