संतोष देशमुख प्रकरणातील वाल्मिक कराड बाबत अनेक खुलासे समोर येतायत कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे ड्रायव्हर च्या नावे अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आलेला होता. आणि यानंतर आता पिंपरी चिंचवड मधील अतिशय उच्चभ्रू सोसायटी मध्ये वाल्मीक कराडचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवडच्या पार्क स्ट्रीट सोसायटी मध्ये एक फ्लॅट खरेदी केल्याची माहिती उघड झाली आहे.