वाशिम जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून यामुळं या जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत विशेषतः वाशिम आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेली पैनगंगा नदी पूर्णपणे भरून वाहत आहे... त्यामुळं जिल्ह्यातील प्रकल्पच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र दुसरीकडे सतत पाऊस पडत असल्यामुळं शेतात पाणी साचून पिकाचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी पेक्षा जास्त पाऊस होत असल्याचं प्रशासनानं दिलेल्या आकडेवारी वरून स्पष्ट होतं आहे.