15 वर्षापूर्वी सोन्याची किंमत काय होती? पुढच्या 15 वर्षांनी सोन्याची किंमत काय असेल? NDTV Report

सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत चाललेत. 2024 च्या शेवटी 76 हजारावर असणारं सोनं आज 1 लाख 30 हजारापर्यंत पोहोचलंय. पुढेही सोन्याची किंमत वाढतच जाणार आहे. पण ती किती वाढेल? याचा अंदाज कुणी बांधू शकत नाही. असं असलं तरी आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी सोन्याच्या दराबाबत एक अंदाज वर्तवलाय, त्यामुळे मोठी खळबळ उडालीय. कारण, 2040 मध्ये सोन्याचा दर एखाद्या प्रायव्हेट जेट इतका होईल, असा दावाच त्यांनी केलाय. त्यामुळे आज खरेदी केलेलं एक एक ग्रॅम सोनं उद्या तुम्हाला श्रीमंत करुन जाणार हे नक्की... त्यामुळे गोयंका यांचा दावा नेमका काय आहे? 15 वर्षापूर्वी सोन्याची किंमत काय होती आणि पुढच्या 15 वर्षांनी सोन्याची किंमत काय असेल, जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ