राज्यात एसटी सह रिक्षा टॅक्सी चा प्रवास महागणार आहे. एसटी च्या तिकीट दरामध्ये जवळपास पंधरा टक्के वाढ करण्यात आली आहे. एसटी ची भाडेवाढ आजपासून लागू होती आहे. रिक्षा आणि टॅक्सी च्या दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रिक्षाचं किमान भाडं हे तेवीस रुपयांवरून आता सव्वीस रुपये झालंय. तर टॅक्सी चं किमान भाडं हे अठ्ठावीस रुपयांवरून एकतीस रुपये झालंय.