देवाच्या दारी त्याचे सर्वच भक्त एकसमान असतात... देव आपल्या भक्तांमध्ये कधीच भेद करत नाही.. हे तुम्हा आम्हाला आपल्याच थोरामोठ्यांनी लहानपणापासून सांगितलं.. मग त्याच देवाच्या दरबारात भेदभाव का केला जातो? आणि जर तसं होत असेल तर खरंच तिथं देव आहे का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना मिळणारी ही वागणूक.. पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट..