Pakistani Maulana Video Viral: पाकिस्तानच्या रावलपिंडी शहरात झालेल्या अनोख्या लग्नानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 70 वर्षांच्या हकीम बाबरने 22 वर्षांच्या तरुणीसोबत लग्न केलंय. वयात 48 वर्षांचं अंतर असल्याने हे लग्न इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरलं आहे. नवरा-नवरीच्या फोटोशूटचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून लोकांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
व्हायरल झाला ब्रायडल फोटोशूट
लग्नानंतर कपलने प्रोफेशनल ब्रायडल फोटोशूट केलं.फोटो आणि व्हिडीओत नवरा-नवरी वेगळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे. एक क्लिपमध्ये वधू एक था टायगर चित्रपटातील 'दिल दियां गल्लां' गाणं बोलताना दिसते.दुसरीकडे वृद्ध नवराही सुरात सूर मिसळताना दिसतो. या कपलचा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. X(ट्विटर)वर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.