जाहिरात

22 वर्षांच्या तरुणीनं 70 वर्षांच्या वृद्धासोबत थाटला संसार, भन्नाट कारण आलं समोर, व्हिडीओ पाहून लोक चक्रावले

नवरा नवरीच्या वयात 48 वर्षांचं अंतर असल्याने हे लग्न इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरलं आहे. व्हिडीओ पाहून सर्वच थक्क झाले आहेत.

22 वर्षांच्या तरुणीनं 70 वर्षांच्या वृद्धासोबत थाटला संसार, भन्नाट कारण आलं समोर, व्हिडीओ पाहून लोक चक्रावले
Viral Bridal Photoshoot Video

Pakistani Maulana Video Viral: पाकिस्तानच्या रावलपिंडी शहरात झालेल्या अनोख्या लग्नानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 70 वर्षांच्या हकीम बाबरने 22 वर्षांच्या तरुणीसोबत लग्न केलंय. वयात 48 वर्षांचं अंतर असल्याने हे लग्न इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरलं आहे. नवरा-नवरीच्या फोटोशूटचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून लोकांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. 

व्हायरल झाला ब्रायडल फोटोशूट 

लग्नानंतर कपलने प्रोफेशनल ब्रायडल फोटोशूट केलं.फोटो आणि व्हिडीओत नवरा-नवरी वेगळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे. एक क्लिपमध्ये वधू एक था टायगर चित्रपटातील 'दिल दियां गल्लां' गाणं बोलताना दिसते.दुसरीकडे वृद्ध नवराही सुरात सूर मिसळताना दिसतो. या कपलचा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. X(ट्विटर)वर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

नक्की वाचा >> Kalyan News : कल्याण बैलबाजार परिसरात संतापजनक प्रकार, भावाने लहान बहि‍णींना शाळेत नेलं, पण नंतर घडलं भयंकर

कपलने काय म्हटलं? 

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, हकीम बाबरने म्हटलंय की, हे लग्न त्यांच्या मर्जीने झालं आहे. वय फक्त एक नंबर आहे. जर प्रेम खरं असेल तर नातं मजबूत राहतं.त्यांनी हे सुद्धा म्हटलं की, त्यांनी एका घटस्फोटीत महिलेसोबत लग्न केलं आहे. हा एक योग्य निर्णय असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नवरीनेही माध्यमांशी बोलताना म्हटलं की, खरं प्रेम वय पाहत नाही.

नक्की वाचा >> Pune News : पुणे हादरलं! फक्त 20 रुपयांसाठी केलं खतरनाक कृत्य, एकाच दिवशी 2 भयानक घटना घडल्याने नागरिक भयभीत

Listen to the latest songs, only on JioSaavn.com