जाहिरात

'मी आणि ऐश्वर्या राय घटस्फोट घेत आहोत'? अभिषेक बच्चनच्या Viral Video चं सत्य काय?

Abhishek Bachchan Viral Video : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यातील नात्यांची चर्चा सुरु असतानाच एका व्हायरल व्हिडिओमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

'मी आणि ऐश्वर्या राय घटस्फोट घेत आहोत'? अभिषेक बच्चनच्या Viral Video चं सत्य काय?
Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुंबई:

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)  आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हे सध्या त्यांच्या नातेसंंबंधांच्या मुद्द्यावरुन चर्चेत आहेत. अनंत अंबानीचं लग्न आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील फोटो समोर आल्यानंतर दोघांमध्ये 'ऑल इज वेल' नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

अभिषेक आणि ऐश्वर्या सध्या सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याची अनेकांची समजूत आहे. त्याचवेळी एका व्हायरल व्हिडिओनं सर्वांना धक्का बसलाय. या व्हिडिओमध्ये अभिषेक कथितपणे आपण ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेत आहे, असं सांगत आहे. 

( नक्की वाचा : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिसला अभिषेक बच्चन, व्हायरल फोटो पाहून फॅन्सनी विचारला प्रश्न )
 

व्हिडिओमध्ये घटस्फोटाची गोष्ट

सध्या सर्वत्र व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ डिपफेक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामध्ये एआय टूल्सच्या माध्यमातून अभिषेकच्या व्हिडिओसोबत त्याचा आवाज सिंक करण्यात आला आहे. या व्हिडिओत मी आणि ऐश्वर्या यांनी जुलै महिन्यात घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे आराध्यासाठी आहे,' असं अभिषेक कथितपणे सांगत आहे.  

हा व्हिडिओ पाहून तो फेक असल्याचं स्पष्ट समजतंय. व्हिडिओ आणि व्हॉईस यामध्ये समन्वय नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अफवा पसरवणाऱ्यांना युझर्सनी चांगलंच सुनावलं आहे. काही जणांनी या व्हिडिओवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिसला अभिषेक बच्चन, व्हायरल फोटो पाहून फॅन्सनी विचारला प्रश्न
'मी आणि ऐश्वर्या राय घटस्फोट घेत आहोत'? अभिषेक बच्चनच्या Viral Video चं सत्य काय?
who-is-alysha-newman-canadian-olympic-medallist-with-onlyfans-account-viral-for-twerk-celebration
Next Article
Only Fan Page मुळे चर्चा, मेडल जिंकताच Video व्हायरल! कोण आहे ती खेळाडू?