जाहिरात

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिसला अभिषेक बच्चन, व्हायरल फोटो पाहून फॅन्सनी विचारला प्रश्न

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) त्यांच्या नात्यातील तणावामुळे चर्चेत आहेत.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिसला अभिषेक बच्चन, व्हायरल फोटो पाहून फॅन्सनी विचारला प्रश्न
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधील अभिषेक बच्चनचे फोटो व्हायरल झाले आहेत.
मुंबई:

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) त्यांच्या नात्यातील तणावामुळे चर्चेत आहेत. अनंत अंबानी यांच्या लग्नात हे दोघं वेगवेगळे गेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा या जोडीची चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर अभिषेक बच्चनचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर या जोडीच्या नात्याची चर्चा सुरु झाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अभिषेक बच्चन या फोटोत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मजा करताना दिसतोय. अभिषेक या फोटो कॅज्युअल लूकमध्ये आहे. ऑरेंज कलरचा शर्ट आणि ब्लू डेनिमसह त्यानं त्याचा आवडता चष्माही घातलाय. पण, या फोटोत अभिषेक एकटाच दिसतोय. यापूर्वी अनेकदा या प्रकारच्या कार्यक्रमात अभिषेक-ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या एकत्र दिसत असतं. ऐश्वर्या राय नुकतीच न्यूयॉर्कमध्ये एकटीच सुट्टी घालवताना दिसली होती. 

ऐश्वर्या कुठंय?

या फोटोमध्ये अभिषेक आनंदी दिसतोय. तो कधी थंब्स अप करणारा तर कधी तिरंगा ध्वज छातीला कवटाळणाऱ्या अभिषेकचे फोटो पाहून त्याच्या मुडचा अंदाज येऊ शकेल. त्यावेळी फॅन्स त्याला ऐश्वर्या आणि आराध्या कुठं आहेत? हा प्रश्न विचारत आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी 17 वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. ते घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

अभिषेकनं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर घटस्फोटाचा उल्लेख असलेली एक पोस्ट लाईक केली आहे. 'प्रेम सोपं का राहत नाही' या विषयावर या पोस्टमध्ये चर्चा करण्यात आलीय. विवाहित जोडपे वेगळे का होतायत? त्यांच्या या निर्णयाची कारणं काय आहेत? ग्रे घटस्फोट का वाढत आहेत? हे प्रश्न या पोस्टमध्ये विचारण्यात आले आहेत.

( नक्की वाचा : अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो? )
 

अभिषेक बच्चननं जी पोस्ट लाईक केलीय त्यामध्ये पुढं लिहिलं आहे की, '50 वर्षांपेक्षा जास्त वयांच्या जोडप्यांमध्ये घटस्फोट घेण्याचं प्रमाण जगभरात वाढत आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. पण, आश्चर्यकारक नाही. 

Previous Article
प्राजक्ताचा फुलवंती या तारखेला होणार रिलीज, बाबासाहेब पुरंदरेंच्या कादंबरीची कथा झळकणार मोठ्या पडद्यावर
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिसला अभिषेक बच्चन, व्हायरल फोटो पाहून फॅन्सनी विचारला प्रश्न
Veteran marathi actor Vijay Kadam passed away
Next Article
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी