जाहिरात

Viral Video: 72 तासात नोकरी गेली, पण खचली नाही..आता करते 8 पट जास्त कमाई, 'या' इंजिनिअर तरुणीची सर्वत्र चर्चा

एका AI ऑटोमेशन इंजीनिअरची स्टोरी सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

Viral Video: 72 तासात नोकरी गेली, पण खचली नाही..आता करते 8 पट जास्त कमाई, 'या' इंजिनिअर तरुणीची सर्वत्र चर्चा
AI Engineer Viral Video

AI Engineer Girl Video Viral :  एका AI ऑटोमेशन इंजीनिअरची स्टोरी सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. इंजीनिअर रितू मोर्याने म्हटलंय की,तिला नोकरी सुरु झाल्यानंतर तीन दिवसांनी एक IITian फाउंडरने निकाल दिला होता.पण त्या घटनेआधी तिची कमाई पहिल्यापेक्षा आठ पटीने वाढली. कसं ते पाहा या व्हायरल व्हिडीओत..

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओत रितू मोर्याने म्हटलंय की, तिला नोकरी दरम्यान सांगण्यात आलं होतं की, फाऊंडर त्यांना काम शिकवणार आणि मार्गदर्शन करणार. पण जेव्हा त्यांनी काम सुरु केलं, तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. फाऊंडर नेहमी मेसेजला खूप तासांनंतर उत्तर द्यायचे,असं या तरुणीचं म्हणणं आहे. तसच कॉलवर काही गोष्टी समजावण्यासाठीही तयार नसायचे. नोकरीच्या 72 तासानंतरही फाऊंडरने एका क्लाईंट समोर तरुणीवर टीका केली. जे काम तरुणीनं केलंय, ते त्यांनी एका तासात केलं असतं, असं ते म्हणाले होते. 

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहार बंद, महिला बचत गटही चिंतेत, घडलंय तरी काय?

'हा अनुभव खूप कठीण होता'

रितू म्हणाली, हा अनुभव तिच्यासाठी खूप कठीण होता. या घटनेनंतर ती खूप दु:खी झाली आणि खूप वेळ या धक्क्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी दुसऱ्या लोकांसोबत बोलणं केलं, तेव्हा तिला समजलं की, त्या कंपनीबाबत अनेक लोकांनी याआधीही ‘टॉक्झिक वर्कप्लेस'म्हणत कंपनीविरोधात तक्रार केली होती. या प्रकारानंतर रितून हार मानली नाही. तिने स्वत: शिकण्याचा निर्णय घेतला. तिने ऑनलाईन ट्यूटोरिअर पाहिले. सहकाऱ्यांकडून सल्ला घेतला आणि मनात जे प्रश्न आले, ते विचारताना थोडीही घाबरली नाही. हळूहळू तिने तिच्या कामाला चांगल्या प्रकारे समजून घेतलं.

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात गॅस सिलिंडरचा साठा किती? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींनी दिली सर्वात मोठी अपडेट

लिंक्डइन पोस्टने दिली नवी संधी

रितूची लिंक्डइनवलक एका अशा फाऊंडरसोबत ओळख झाली,ज्यांनी तिला योग्य मार्गदर्शन केलं आणि तिच्या कामावर विश्वास ठेवला. रितूने म्हटलंय की, तिचं आताचं वेतन त्या सॅलरीच्या जवळपास आठ पटीनं जास्त आहे. जी तिला पहिल्या नोकरीसाठी ऑफर करण्यात आली होती. सतत शिकत राहिल्यानं आण योग्य मेन्टॉर मिळाल्यावर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com