अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक जेफ बेजोस गर्लफ्रेंड लॉरेन सांचेंज (55) यांच्याशी लग्न करणार आहे. सध्या जगभरात त्यांच्या लग्नाची मोठी चर्चा सुरू आहे. 28 डिसेंबर रोजी कोलोराडोतील एस्पेनमध्ये लग्न पार पडणार आहे. या लग्नाचा खर्च वाचून तुम्हाला धक्का बसेल. या लग्नासाठी 200 ते 300 कोटी नाही तर तब्बल 5 हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
नक्की वाचा - घात की अपघात? जॉर्जियामधील रेस्टॉरंटमध्ये 11 भारतीयांच्या अचानक मृत्यूने खळबळ
या लग्नाचा खर्च 600 मिलियन डॉलर म्हणजे पाज हजार कोटींपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. डेलिमेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, लग्नापूर्वीच्या सर्व सेलिब्रेशन एका पॉश सुशी रेस्टॉरंट मात्सुहिसामध्ये होईल. हे रेस्टॉरंट 26 आणि 27 डिसेंबरसाठी बुक करण्यात आलं आहे.
लग्नामध्ये मोठ्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश...
बेजोस आणि संचेज यांच्या लग्नात केवळ कुटुंब आणि मित्रपरिवार सामील होणार असल्याची माहिती आहे. 2023 मध्ये यांचा साखरपुडा झाला होता. त्यावेळी बिल गेट्स, लियोनार्डे डिकॅप्रियो आणि क्रिस जेनर यांसारखी मोठमोठी व्यक्तिमत्त्व सामील झाली होती. ही सर्व मंडळी साखरपुड्याला उपस्थित होती, त्यामुळे लग्नातही आमंत्रित असल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - अमेरिकन नागरिकत्वाचा शॉर्टकट बंद होणार? संपूर्ण जगाचं ट्रम्पकडे लक्ष
प्रपोज करताना दिलं होतं 20 कॅरेट हिऱ्याचं गिफ्ट...
बेजोस यांनी सांचेज यांना प्रपोज करताना एक अंगठी दिली होती. त्यात हार्ट शेपचा हिरा होता. हा हिरा 20 कॅरेटचा होता. सांजेच या एका ब्रॉडकास्ट पत्रकार होत्या.
2019 मध्ये पहिलं लग्न तुटलं...
बेजोस यांनी 2005 मध्ये हॉलिवूड एजंट पेट्रिक व्हाइलसेल यांच्याशी लग्न केलं होतं. साधारण १३ वर्षे लग्नसंबंधात राहिल्यानंतर 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.