जाहिरात

घात की अपघात? जॉर्जियामधील रेस्टॉरंटमध्ये 12 भारतीयांच्या अचानक मृत्यूने खळबळ

जॉर्जियाच्या सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मृतांमध्ये 11 परदेशी तर एक जॉर्जियाचा नागरिक आहे.

घात की अपघात? जॉर्जियामधील रेस्टॉरंटमध्ये 12 भारतीयांच्या अचानक मृत्यूने खळबळ

जॉर्जियातील एका रेस्टॉरंटमध्ये 11 भारतीय नागरिक मृतावस्थेत आढळले. जॉर्जियातील भारतीय मिशनने ही माहिती दिली. जॉर्जिया सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक तपासणीत कोणत्याही जखमा किंवा हिंसाचाराची चिन्हे आढळली नाहीत. स्थानिक मीडियाने पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, सर्वांचा मृत्यू कार्बन मोनोऑक्साइड वायूमुळे झाला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तिबिलिसीतील भारतीय मिशनने सांगितले की, सर्व 11 मृत भारतीय नागरिक होते. जॉर्जियाच्या सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मृतांमध्ये 11 परदेशी तर एक जॉर्जियाचा नागरिक आहे. निवेदनानुसार, सर्व मृत व्यक्ती भारतीय रेस्टॉरंटमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते आणि त्यांचे मृतदेह दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बेडरूममध्ये सापडले. 

(नक्की वाचा - Pune Crime News: 100 रुपयांची केला घात, लाडकी दांडक्याने मारहाण करत एकाची हत्या)

 
भारतीय मिशनने येथे जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, "जॉर्जियामधील गुदौरी येथे 12 भारतीय नागरिकांच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे. शोकाकुल कुटुंबियांना मनापासून संवेदना. मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांची माहिती मिळवण्यासाठी मिशन स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. शक्य ते सर्व सहकार्य केले जाईल, असं मिशनने म्हटलं आहे. 

(नक्की वाचा-  फक्त 20 रुपयात टक्कल दूर करण्याचा उपाय! इतकी गर्दी की रस्ते झाले जाम, पाहा Video)

स्थानिक पोलिसांनी या घटनेनंतर तपास सुरू केला आहे. निष्काळजीपणाने मृत्यू झाला का याबाबत देखील पोलीस तपास करत आहे. प्राथमिक तपासानुसार, बेडरुमच्या जवळील एका बंद जागेत विद्युत जनरेटर ठेवण्यात आला होता. जो शुक्रवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर चालू झाला होता. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक तपासणीही केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: