जाहिरात

अमेरिकन नागरिकत्वाचा शॉर्टकट बंद होणार? संपूर्ण जगाचं ट्रम्पकडे लक्ष

Trump And US Birth Right Citizenship: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बर्थ राईट सिटीझनशिप कायदा रद्द करण्याचं आश्वासन दिलं आहे

अमेरिकन नागरिकत्वाचा शॉर्टकट बंद होणार? संपूर्ण जगाचं ट्रम्पकडे लक्ष
मुंबई:

Trump And US Birth Right Citizenship: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बर्थ राईट सिटीझनशिप कायदा रद्द करण्याचं आश्वासन दिलं आहे. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात स्थलांतरितांचा मुद्दा प्रखरतेनं मांडला होता. त्यांना या मुद्यावर अमेरिकन मतदारांनी प्रतिसाद दिल्याचं निवडणूक निकालामध्ये स्पष्ट झालं. आता सत्तेवर आल्यानंतर ट्रम्प यांना हा कायदा रद्द करणे शक्य आहे का? याची चर्चा सुरु झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे कायदा?

बर्थ राईट सिटीझनशिपनुसार अमेरिकेत जन्मलेलं कोणतंही मुल त्या देशाचं नागरिक बनतं. हा कायदा अनेक वर्षांपासून लागू आहे. या कायद्यानुसार अमेरिकेत अवैध पद्धतीनं दाखल झालेले  नागरिक, अमेरिकेत पर्यटनानासाठी आलेले अथवा अमेरिकेत स्टुडंट व्हिसावर आलेल्या विद्यार्थ्यांनाही हा कायदा लागू आहे. या कायद्याचा फायदा घेऊन स्टुडंट व्हिसा अथवा टुरिस्ट व्हिसा घेऊन आलेल्या अनेकांना अमेरिकेत मुलाला जन्म दिलाय. अमेरिकेत अवैध राहणाऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो. त्यामुळे अमेरिकेतील डेमोग्राफीमध्ये देखील बदल होत आहे. 

14 वर्षांच्या मुलाच्या पेंटिंगमुळे सीरियात 50 वर्षांच्या सत्तेला सुरुंग, 13 वर्षात नेमकं काय घडलं?

( नक्की वाचा :  14 वर्षांच्या मुलाच्या पेंटिंगमुळे सीरियात 50 वर्षांच्या सत्तेला सुरुंग, 13 वर्षात नेमकं काय घडलं? )

ट्रम्प यांचं मत काय?

हा कायदा प्रत्येक देशामध्ये नाही. त्यामुळे ट्रम्प आणि त्यांच्य समर्थकांनी हा कायद्याचा गैरवापर असल्याचा दावा केलाय. अमेरिकेत नागरिकत्व मिळवण्याचे नियम कठोर असावेत, असा त्यांचा दावा आहे. तर अमेरिकन कायद्यातील 14 व्या संशोधनानंतर हा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे तो रद्द करणे अवघड असल्याचं ट्रम्प यांच्या विरोधकांचं मत आहे. 

विरोधकांच्या आक्षेपानंतरही ट्रम्प त्यांच्या घोषणेवर ठाम आहेत. त्यांनी पत्रकारांशी बोलताना हा कायदा हास्यास्पद असल्याचं सांगत तो रद्द करण्यासाठी आम्ही योजना बनवली आहे, असं स्पष्ट केलं. 

राहुल गांधींशी कनेक्शन असल्याचा आरोप असलेले George Soros कोण आहेत?

( नक्की वाचा : राहुल गांधींशी कनेक्शन असल्याचा आरोप असलेले George Soros कोण आहेत? )

अमेरिकन अध्यक्षांना या कायद्यात सुधारणा करणे अवघड असल्याचं मत तेथील कायदा तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. या कायद्यामधील सुधारणांना कोर्टात आव्हान दिलं जाईल. तिथं ह्या सुधारणा टिकणार नाहीत, असा विरोधकांचा दावा आहे. पण, विरोधकांच्या दाव्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे समर्थक हा कायदा रद्द करणे अशक्य नसल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प याबाबत काय निर्णय घेतात याकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com