दिल्लीतील एका लहानग्याचे व्हिडीओ मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्लीतील 10 वर्षांचा मुलगा ऑम्लेट रोल विकताना दिसत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच या मुलाला मदत करण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत मुलगा रस्त्यावर गाडी लावून ऑम्लेट रोल विकताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून या मुलाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आणि मुलाच्या भविष्यासाठी मदतीची घोषणा केली आहे.
(नक्की वाचा - अतिशय युनिक, अतिशय वेगळा आमरस डोसा; VIDEO वर नेटिझन्सच्या 'तिखट' कमेंट्स )
व्हिडीयोत मुलगा सांगत आहे की, त्याचे वडील आधी येथे ऑम्लेट रोलची गाडी लावत होते. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली. आई देखील त्यांच्यासोबत राहत नाही. त्यामुळे छोट्या बहिणीच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याच्यावर आहे. ऑम्लेट रोलची गाडी लावण्यासोबतच तो शिक्षणही घेत आहे.
एवढ्या लहान वयात एवढे कष्ट करण्याची जिद्द कुठून येते? यावर बोलताना मुलाने म्हटलं की, मी गुरु गोविंद सिंह यांचा मुलगा आहे. जोपर्यंत माझ्यात ताकद आहे, तोपर्यंत मी लढत राहीन.
आनंद महिंद्रा यांनी मुलाचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर करत त्याच्याबद्दल चौकशी केली. या मुलाला मदत करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, "हिंमत ठेव तुझं नाव जसप्रीत आहे. या सगळ्यात तुझं शिक्षण खराब व्हायला नको. जर कुणाकडे याचा संपर्क क्रमांक असेल तर कृपया शेअर करा. महिंद्रा फाऊंडेशनची टीम या मुलाच्या शिक्षणासाठी कशी मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल."