Why Fighter Jets Have Parachutes : पायलटला फायटर जेटमधून पॅराशूट घेऊन खाली उडी मारतानाचे अनेक सीन्स तुम्ही चित्रपटात पाहिले असतील. पण कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का,की पॅसेंजर प्लेन किंवा प्रायव्हेट जेटमध्ये पॅराशूट का नसते? हे फक्त तांत्रिक कारणांमुळे आहे की सुरक्षा कारणांमुळे? फाइटर जेट आणि कमर्शियल विमानांमध्ये हा मोठा फरक का असतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात..
फायटर जेटमध्ये पॅराशूट का असतं?
फायटर जेट अतिशय वेगाने उडतात आणि अनेकदा धोकादायक ठिकाणी जातात. त्यांच्या उड्डाणादरम्यान इंजिन फेल होणे,क्षेपणास्त्र हल्ला होणे किंवा इतर तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात.अशा वेळी पायलटसाठी पॅराशूट हा जीव वाचवणारा उपाय ठरतो.धोकादायक परिस्थितीत पॅराशूटच्या मदतीने पायलटला सुरक्षितपणे जमिनीवर उतरण्याची संधी मिळते.
नक्की वाचा >> Silver Rate Today : सकाळी कडाडले अन् संध्याकाळी गडगडले..एका दिवसात चांदीच्या दरात लाखाची घसरण, भविष्यात..
पॅसेंजर आणि प्रायव्हेट जेटमध्ये पॅराशूट का नसतं?
कमर्शियल आणि प्रायव्हेट जेट अतिशय उंचावर (सुमारे 30,000–40,000 फूट) उडतात आणि त्यांची गतीही खूप जास्त असते. इतक्या उंचीवर कोणी अचानक विमानातून उडी मारली तर ऑक्सिजनची कमतरता आणि अत्यंत थंड तापमानामुळे जिवंत राहणे खूप कठीण होऊ शकते.
नक्की वाचा >> जगातील 5 सर्वात सुरक्षित प्रायव्हेट जेट, VVIP लोकांचाही आहे विश्वास; PM मोदी, मस्क, रोनाल्डोंचाही समावेश
एरोडायनामिक्स आणि एअरक्राफ्टचं डिझाईन
पॅसेंजर आणि प्रायव्हेट जेट्स आकाराने मोठे आणि वजनदार असतात. त्यांच्या विंग्स आणि इंजिन अशा प्रकारे डिझाइन केलेले असतात की उड्डाण स्थिर राहावे. एखाद्या प्रवाशाने विमानातून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला तर तो इंजिन किंवा विंगजवळ पोहोचू शकतो, जे अत्यंत धोकादायक ठरू शकते. याशिवाय, या विमानांमध्ये प्रवाशांची संख्या खूप जास्त असते, त्यामुळे प्रत्येकासाठी पॅराशूट ठेवणे व्यवहार्य किंवा शक्य नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world