Office Jugaad Viral Post : ऑफिसमध्ये वेबसिरीज पाहायची आहे.पण बॉसने पाहिले तर? असा अनेक कर्मचाऱ्यांना पडत असेल. पण बंगळुरूतील एका टेक्नॉलॉजी एक्सपर्टला बॉसची अजिबातच भीती नाहीय. बॉस काहीच करणार नाही,असं ध्यानी मनी ठेऊन या कर्मचाऱ्याने ऑफिसमध्ये वेब सीरिज पाहण्यासाठी भन्नाट जुगाड केला. या टेक्नोलॉजी एक्सपर्टने अशी एआय डिव्हाइस तयार केली आहे की, जी बॉस दिसताच स्क्रीन बदलून टाकते. त्यामुळे बॉसला कधीच कळत नाही की, कर्मचारी ऑफिसमध्ये काम करत नव्हता. तो कामात व्यस्त आहे, असंच त्याच्या बॉसला वाटतं.
एक्सवर पोस्ट करत जुगाडाचा खुलासा केला
नेटफ्लिक्सवरील आवडती वेबसिरीज एकदा पाहायला सुरुवात केली की ऑफिसमध्ये पोहोचल्यावरही मन तिथेच अडकून राहतं. पण ऑफिसचं वातावरण,कामाचा दबाव आणि बॉसची कडक नजर यामुळे तिथे बसून एंटरटेनमेंट करणं शक्य नसतं.यावर उपाय म्हणून बंगळुरूतील एका तंत्रज्ञाने एक भन्नाट जबरदस्त आयडिया शोधून काढली आहे. बंगळुरूमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तीने एक्सवर पोस्ट करत त्याने केलेल्या जुगाडाचा खुलासा केला आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलंय की, नेटफ्लिक्स पाहताना बॉसने एकदा त्याला रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतरच या डिव्हाइसची कल्पना सुचली.