Viral Video: अनेकदा आपलं एक छोटं पाऊल एखाद्याचा दिवस अविस्मरणीय बनवू शकतो. सध्या सोशल मीडियावर एका Uber चालकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्याने रात्रीच्या वेळी एकटी प्रवास करणाऱ्या महिलेसाठी जे केलं त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
इंस्टाग्रामच्या @yogitaarathore या अकाऊंटवर शेअर केलेल्या 'रील'मध्ये तरुणीने सांगितले की, ती Uber बुक करून बंगलुरू विमानतळाकडे जात होती. प्रवासादरम्यान ती आपल्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होती.
ती आपल्या मैत्रिणीला सांगत होती की, आजचा दिवस तिच्यासाठी किती कठीण होता. मानसिक ताण वाढल्यामुळे रडू आलं. पॅकअप झाल्यानंतर तिला खूप भूक लागली होती आणि तिचे विमान रात्री 2 वाजता होते. तरुणीचे बोलणे ऐकून ड्रायव्हरने अचानक गाडी थांबवली. तरुणीलाला वाटले की ड्रायव्हर वॉशरूमसाठी गेला असेल. पण काही वेळाने कॅब ड्रायव्हर बाहेरून सँडविच घेऊन परतला. त्याने तरुणीसाठी सँडविच आणले होते.
(नक्की वाचा- kalyan News: "मराठी बोलायला लाज वाटते का?", ट्रेनमधील मारहाणीनंतर तणावातून मराठी तरुणाची आत्महत्या)
फोनवरचं बोलणं ऐकून आणलं सँडविच
तुम्ही इतक्या वेळा भूक लागल्याचं बोललात, माझ्या मनात हे घर करून बसलं. माझ्या बहिणीलाही भूक लागली असती, तर मला वाईट वाटलं असतं. आणि तुम्ही फोनवर शाकाहारी जेवणाबद्दल बोलत होतात, म्हणून मी खास शाकाहारी सँडविच शोधत होतो, उबर चालकाने म्हटलं.
Uber चालकाच्या या कृतीने महिला भावुक झाली आणि तिने त्याला "तुम्ही माझ्या कायम आठवणीत राहाल", असे सांगितले. तरुणीने या ड्रायव्हरचे नाव 'पूकी भैय्या' असल्याचे सांगितले.
(नक्की वाचा- Pratika Rawal's Photos: व्हीलचेअरनंतर प्रतिकाचा स्टायलिश लूक! मेकओव्हरचे फोटो व्हायरल)
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
योगिता राठोड नावाच्या युजरने ही रील पोस्ट करताना Uber India चे अशा उत्कृष्ट ड्रायव्हर्ससाठी आभार मानले आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ 7 लाखहून लोकांनी पाहिला आहे. तर 87 हजारहून अधिक लोकांना हा व्हिडीओ लाईक केला आहे.