पठ्ठ्याची कमाल ! बांबूपासून बनवली 'जुगाडू' सायकल, किंमत ऐकून हैराण व्हाल

पंधरा हजारा पासून ते अगदी लाखोच्या सायकलही सध्या बाजारात आहेत. त्यामुळे त्याही घेणं काही जणांसाठी अवघड होवून बसले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
ये है बिहार की बंबू साइकिल, कमाल का है ये जुगाड़
पाटणा:

सायकल ही सर्व सामान्य माणसाची सवारी. सायकल म्हटली की स्वस्त आणि मस्त. ना पेट्रेल- डिझेलची झंझट, ना इंजिनची कटकट. पण परिस्थिती नुसार सायकलच्या ही किंमती वाढत गेल्या. पंधरा हजारा पासून ते अगदी लाखोच्या सायकलही सध्या बाजारात आहेत. त्यामुळे त्याही घेणं काही जणांसाठी अवघड होवून बसले आहे. असाच एक तरूण ज्याला सायकलची गरज होती. पण खरेदी करण्यासाठी मुबलक पैसे नव्हते. मग काय त्याने असा काही जुगाड केला की त्याने पिझ्झा जेवढ्या किंमतीत मिळतो तेवढ्या पैशात एक देसी जुगाडू सायकल बनवून टाकली. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

  बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका तरूणाला सायकलची गरज होती. पण पुरेसे पैसे नव्हते. मग त्यांने बांबूच्या सहाय्याने इको फ्रेंडली सायकल बनवली. अमरेश कुशवाह या तरूणाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते एका तरूणा बरोबर बोलताना दिसत आहेत. तो तरूण बांबूने बनवलेली सायकल चालवत आहे. या तरूणाने सांगितलं आहे की तो याच सायकलने आता प्रवास करतो. ही बांबूची सायकल सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायर झाली आहे. जवळपास 1 लाख 68 हजार जणांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. त्याने केलेला हा जुगाड सर्वांना पसंत पडला आहे. 

समस्तीपूरच्या या तरूणाची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे सर्वात स्वस्त सायकलही तो खरेदी करू शकत नव्हता. त्यावर त्याने एक रामबाण उपाय शोधून काढला. त्याने बांबूच्या सहाय्याने फक्त 500 रूपयात एक सायकल बनवली आहे. एक पिझ्झा जेवढ्या किंमतीला मिळतो तेवढ्या किंमतीत त्याने सायकल बनवली आहे. ही सायकल बनवण्यासाठी त्याला 25 दिवस लागले. 15 ऑगस्ट पासून तो ही सायकल वापरत आहे. या सायकलवरूनच तो आपली रोजची कामेही करतो. सध्या त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.  

Advertisement
Topics mentioned in this article