Funny Video : नवरी जोमात, वऱ्हाडी कोमात! व्हायरल व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

Viral Video : सोल्जर चित्रपटातील 'बल्ले बल्ले...' गाण्यावर ती नाचत आहे. नवरी बेभान होऊन आनंदात नाचत आहे. नवरीचा उड्या मारणारा डान्स पाहून सगळे तिच्याकडे एकटक बघत आहेत. 

Advertisement
Read Time: 2 mins

लग्नामध्ये नवरीने डान्स करणे सध्याचा ट्रेंड आहे. नवरींचे अनेक डान्स व्हिडीओ आजवर व्हायरल झाले आहे. असाच एक नवरीचा डान्स व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओत नवरी जोमात डान्स करताना दिसत आहे. मात्र तिचा डान्स पाहून वऱ्हाडी मंडळींचं काय झालं असेल, ते सांगता येत नाही.

व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. व्हायरल व्हिडीयोतील नवरी अशी नाचत आहे जसं कुणा दुसऱ्याचं लग्न आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात मजेशीर कमेंट करत आहेत. 

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लाल रंगाचा ड्रेस घातलेली नवरी दिसत आहे. तिच्या चारही बाजूंनी वऱ्हाडी जमले आहेत. सोल्जर चित्रपटातील 'बल्ले बल्ले...' गाण्यावर ती नाचत आहे. नवरी बेभान होऊन आनंदात नाचत आहे. तिच्या गळ्यातील हार, दागिने देखील खाली पडत आहेत. तरी देखील नवरी आपल्या डान्समध्ये मग्न आहे. नवरीचा उड्या मारणारा डान्स पाहून सगळे तिच्याकडे एकटक बघत आहेत. 

Advertisement

सोशल मीडियावर लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून त्यावर 5 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, "दीदीचा डान्स वर्षानुवर्षे रखडला होता, आज त्याचा स्फोट झाला."

ये भी पढ़ें: प्रीती जिंटा के गाने पर अपनी ही शादी में ऐसे डांस करने लगी दुल्हन लोग भूल गए ब्राइडल एंट्री, बोले- ये क्या देख लिया

Advertisement