Buldhana News: भन्नाट देसी जुगाड! दुचाकीचा आधार घेत शेतीसाठी युवा शेतकऱ्याची आयडिया, Video होतोय व्हायरल

खामगाव तालुक्यातील या शेतकऱ्याने शेतीतील आंतरमशागतीसाठी एक अद्भूत जुगाड केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
बुलढाणा:

अमोल सराफ 

पाऊस झाल्याने राज्यातील अनेक भागात शेतीची कामं जोरदार पणे सुरू आहेत. यात काही अडचणींना शेतकऱ्यांना समोरे जावे लागत आहे. असं असलं तरी त्यातून ही बळीराज काही तरी मार्ग काढत आहेत. आता थांबायचं नाय या तत्वानुसार तो काम करत आहे. अशाच एका कल्पक शेतकऱ्याने केलेल्या भन्नाट आयडियाची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. हा शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील आहे. त्याने शेतीच्या मशागतीसाठी चक्क दुचाकीचा उपयोग केला आहे. शिवाय यशस्वीपणे मशागत ही केली आहे. त्याचा मशागत करतानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

शेतात राबताना शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी शेतीची नांगरणी असो किंवा मशागत असो त्यासाठी बैलजोडी लागते. पण काही ठिकाणी ती उपलब्ध होत नाही. तर दुसरीकडे मशागतीचा खर्चही वाढला आहे. अशा वेळी या शेतकऱ्यांने नामी शक्कल लढवली आहे.  म्हणतात ना, 'गरज ही शोधाची जननी असते' याचंच एक उत्तम उदाहरण बुलढाण्यातील शेतकऱ्याने दाखवून दिलं आहे. त्याने जे काही केलं त्याचं कौतूक पंचक्रोशीत होत आहे. शिवाय त्याची आयडिया ही आता कॉपी केली जात आहे.  

Advertisement

नक्की वाचा - Ashadhi Wari: तुकोबारायांच्या पालखीला का घातलं जातं मेंढ्यांचं रिंगण? काय आहे त्या मागची परंपरा अन् मान्यता

खामगाव तालुक्यातील या शेतकऱ्याने शेतीतील आंतरमशागतीसाठी एक अद्भूत जुगाड केला आहे. त्याने मशागतीसाठी बैलांऐवजी थेट दुचाकीचा वापर केला आहे. तो या दुचाकीच्या मदतीने पिकांची कोळपणी करताना दिसत आहे. दुचाकीच्या मागच्या बाजूसा त्याने कोळपे जोडसे आहे. या माध्यमातून अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात पिकांची मशागत केली जात आहे. वाढत्या महागाईत, त्यासोबत मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्याने लावलेला हा देशी जुगाड सध्या चांगलाच चर्चेत आहे. 

नक्की वाचा - Social Media: सोशल मीडियावर रात्रीचा 'कर्फ्यू'! रात्री 12 नंतर सोशल मीडियावर बंदी, सरकारने बनवला कडक नियम

या देसी जुगाडामुळे शेतकऱ्याच्या वेळेची आणि श्रमाची अशी दोन्ही गोष्टींची बचत होत आहे. या कल्पक शेतकऱ्याच्या जुगाडाची सध्या पंचक्रोशीत मोठी वाहवा होत आहे. त्याच्या या प्रयोगामुळे अन्य शेतकऱ्यांसाठी ही एक पर्याय निर्माण झाला आहे. अनेकांकडे दुचाकी असतात. पण त्याचा वापर अशा पद्धतीने करता येवू शकतो हे त्यांना समजले आहे. त्यामुळे त्याच्याच पावलावर पाऊल टाकून अन्य शेतकऱ्यांनी ही कोळपणीसाठी हा पर्याय निवडला आहे. हा सोपा अन् स्वस्त असल्याने शेतकऱ्याला ही परवडत आहे.