Emaar Hiring Strategy: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा उभारणारी कंपनी एमारचे (Emaar) सर्वेसर्वा मोहम्मद अलाब्बर यांनी भारतीयांचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांच्या टॉप हायरिंग लिस्टमध्ये भारतीय लोक अव्वलस्थानी का असतात? याचे कारण त्यांनी सांगितलंय. त्यांनी सांगितलेले कारणही अतिशय खास आहे, भारतीयांची कामाप्रति असलेली नीतिमत्ता आणि समर्पण इतकंच नव्हे तर ते मध्यरात्री देखील कामासाठी हजर राहतात. मोहम्मद अलाब्बर यांच्या कंपनीत भारतीयांचे वर्चस्व का आहे? यामागील माहिती त्यांनी अतिशय देशी आणि मजेशीर शैलीत सांगितली. याचे कारण कोणतेही पुस्तकी ज्ञान नसून कामाप्रति असलेली त्यांची तीव्र भावना आहे, जे रात्री उशीरा 1 वाजता देखील फोन केल्यानंतर झोपेतून जागे होतात. अलाब्बर यांच्या मते, जगात टॅलेंट खूप असेल, पण भारतीयांसारखे कष्ट आणि शिस्त इतर कोठेही मिळणे अशक्य आहे.
(नक्की वाचा: Do you know: 'AMBULANCE' चा फुल फॉर्म काय आहे? वाहनावर शब्द उलटे का लिहितात? खूप लोकांना माहीतच नाही)
भारतीयांचे 'हार्ड वर्क' जगात एक नंबर (Indian Work Ethic Is Globally Unmatched)
अबू धाबी येथे आयोजित एका परिषदेदरम्यान मोहम्मद अलाब्बर यांनी संवाद साधताना स्पष्टपणे सांगितले की, टॅलेंट आपल्या जागी आहे, पण जी मेहनत भारतीय करतात त्याला तोड नाही. अलाब्बर यांच्या मते, भारतीय कर्मचारी कामाबाबत इतके गंभीर असतात की जर त्यांना रात्री 1 वाजता फोन केला, तरी ते त्या फोनला उत्तर देण्यासाठी तयार असतात. त्यांच्यासाठी स्मार्ट वर्कपेक्षा शिस्त आणि मेहनत अधिक महत्त्वाची असते. स्वतःचे उदाहरण देताना अलाब्बर म्हणाले की, माझा आयक्यू कदाचित सरासरी असेल, पण माझी मेहनत जगातील सर्वोत्तम आहे. हाच 'पॉझिटिव्ह पॅरानोया' म्हणजेच कामाप्रति असलेली सकारात्मक जिद्द यशाची खरी गुरुकिल्ली आहे.
भारतापेक्षा मोठे आणि चांगले मार्केट कोणतेही नाही (Mohamed Alabbar Indian talent)
केवळ वर्कफोर्सच नाही, तर अलाब्बर भारताला एक बाजारपेठ म्हणूनही खूप वरचा दर्जा देतात. 'आजच्या काळात भारतापेक्षा मोठा, स्थिर आणि सतत प्रगती करणारा दुसरा कोणताही देश आहे का?' असा प्रश्न विचारत त्यांनी स्वतःच उत्तर दिलं की, "मुळीच नाही". याच कारणामुळे एमार ग्रुप आता विद्यापीठांसोबत मिळून थेट कर्मचाऱ्यांची भरती करत आहे. 'जेव्हा टॅलेंट मेहनत करणे सोडून देते, तेव्हा कष्टाळूपणाच त्या टॅलेंटवर मात करतो. भारतीयांसोबत काम करणे समाधानकारक आहे, कारण ते कठीण काळातही सोबत उभे राहतात'.
(नक्की वाचा : Viral Video: 10 एकरचा मांडव आणि 3 लाख पाहुणे; मुलीच्या शाही लग्नावरून इंदोरीकरांचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर)
संकटाशी दोन हात करणे आणि पुढे जाणे (Indian Work Ethic)एमारच्या मालकांनी वर्षी 2008ची आर्थिक मंदी आणि कोरोना काळाचा उल्लेख करत सांगितले की, व्यवसायात लवचिकता असणे आवश्यक आहे. भारतीय व्यावसायिकांची मानसिक चपळता आणि नवीन तंत्रज्ञान वेगाने आत्मसात करण्याची क्षमता त्यांना जागतिक स्तरावर खास बनवते. यामुळेच दुबईपासून युरोपपर्यंत त्यांच्या प्रत्येक मोठ्या प्रकल्पात भारतीयांचे वर्चस्व आहे. मोहम्मद अलाब्बर यांचे हे विधान केवळ भारतीयांच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब करत नाही, तर आज जागतिक बाजारपेठेत 'इंडियन टॅलेंट'ची विश्वासार्हता किती मजबूत झाली आहे हे देखील सांगते.
(डिस्क्लेमर: ही माहिती सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टच्या आधारावर देण्यात आली आहे. एनडीटीव्ही याची पुष्टी करत नाही.)