जाहिरात

Do you know: 'AMBULANCE' चा फुल फॉर्म काय आहे? वाहनावर शब्द उलटे का लिहितात? खूप लोकांना माहितच नाही

रुग्णवाहिकेचं नाव ऐकताच डोक्यात जीवन वाचवणारं वाहन असा विचार येतो.रस्ते अपघात असो,हार्ट अटॅक, कोणत्याही व्यक्तीची मेडिकल एमरजन्सी असो,अशा परिस्थितीत तातडीनं रुग्णवाहिका (Ambulance) बोलावली जाते.

Do you know: 'AMBULANCE' चा फुल फॉर्म काय आहे? वाहनावर शब्द उलटे का लिहितात? खूप लोकांना माहितच नाही
Ambulance Full Form And Other Details

AMBULANCE Full Form : रुग्णवाहिकेचं नाव ऐकताच डोक्यात जीवन वाचवणारं वाहन असा विचार येतो.रस्ते अपघात असो,हार्ट अटॅक, कोणत्याही व्यक्तीची मेडिकल एमरजन्सी असो,अशा परिस्थितीत तातडीनं रुग्णवाहिका (Ambulance) बोलावली जाते. पण तुम्हाला AMBULANCE चा फुल फॉर्म माहित आहे का? नसेल, तर वाचा खाली दिलेली सविस्तर माहिती.

'AMBULANCE'चा फुल फॉर्म काय आहे?

सोशल मीडियावर लोक 'AMBULANCE'चा फुल फॉर्म सांगतात - Aid Medical Benefit Urgent Life And Nursing Care Emergency म्हणजेच अॅम्बुलन्स अशी सेवा आहे, जी आपात्कालिन परिस्थितीत रुग्णाला मेडिकल सपोर्ट आणि त्या रुग्णाची देखभाल करते.दरम्यान, हा अधिकृत फुल फॉर्म नाही आहे.लोकांनी इंटरनेटवर असा फुल फॉर्म सांगितला आहे. 

‘Ambulance'शब्दाची कहाणी

Ambulance' शब्द लॅटिन भाषेचं आहे. लॅटिन भाषेचा शब्द 'Ambulare' ने याचा निर्माण झाला होता. याचा अर्थ असा होतो,चालणे किंवा इकडे तिकडे फिरणे. नंतर फ्रेंच भाषेत 'Hôpital Ambulant' शब्दाचा वापर होऊ लागला. चालता-फिरता असा याचा अर्थ होतो.हळूहळू हा शब्द मेडिकल एमरजन्सी वाहनासाठी प्रसिद्ध झाला.  

नक्की वाचा >> Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल कोण चोरायचे? 'ते' तीन चोरटे अखेर सापडले

रुग्णावाहिकेला जीवनवाहिनी का म्हणतात?

अॅम्बुलन्स रुग्णाला फक्त हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचं काम करत नाही,तर ही चालती-फिरती मेडिकल युनिट असते. यामध्ये अनेक आवश्यक उपकरणे असतात. जसं की, ऑक्सीजन सिलेंडर,स्ट्रेचर,हार्ट मॉनिटर,फर्स्ट एड किट,व्हेंटिलेटर,एमरजन्सी औषधे. 

का उलटं लिहितात नाव ?

तुम्ही नेहमीच पाहिलं असेल की,रुग्णावाहिकेच्या पुढे  AMBULANCE शब्द उलटा लिहिलेला असतो. असं यासाठी केलं जातं की,पुढे जाऊन वाहनाचा ड्रायव्हर त्यांच्या रिअर-व्ह्यू मिररमध्ये याला थेट वाचू शकेल आणि तातडीनं रस्ता देईल. यामुळे एमरजन्सी रुग्णाला रुग्णालयात लवकर पोहोचण्यासाठी मदत मिळते. 

नक्की वाचा >> Sangli News: सांगलीच्या 'या' गावात घडतात अघटित घटना..एक थेंबही दूध विकलं जात नाही, कारण वाचून हादरूनच जाल

रुग्णवाहिका सेवा

भारतात 108 आणि 102 सारखी एमरजन्सी सुविधा खूप लोकप्रिय आहे.एका कॉलवर अॅम्बुलन्स काही वेळातच रुग्णापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते.सरकार आणि काही संस्था या सुविधेला अधिक प्रभावी करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com