जाहिरात

हरणाचा वेग पाहून चित्त्यालाही घाम फुटला..हवेत एकच झडप अन् खेळ खल्लास..शेवटी कोण जिंकलं? थक्क करणारा Video

Cheetah Hunting Deer Video : चित्त्याची दमछाक करणारं हरणही तितकचं चपळ..चित्ता वेगानं जरी धावत असला, तरी हरीण चित्त्यालाही घाम फोडते. चित्ता आणि हरणाच्या रेसचा एक खतरनाक व्हिडीओ एक्सवर व्हायरल झाला आहे.

हरणाचा वेग पाहून चित्त्यालाही घाम फुटला..हवेत एकच झडप अन् खेळ खल्लास..शेवटी कोण जिंकलं? थक्क करणारा Video
Cheetah vs Deer Viral Video
मुंबई:

Cheetah Hunting Deer Video :   चित्ता हा सर्वात वेगानं धावणारा प्राणी आहे, असं म्हटलं जातं. चित्त्याच्या वेगाची ना कोणती सीमा आहे..ना कोणी टक्कर देणारा प्राणी आहे. एकदा चित्त्यानं शिकार करायचं ठरवलं, तर तो मागे वळून पाहत नाही..म्हणजेच त्याच्या तावडीतून शिकार सुटणं जवळपास अशक्यच असतं. पण चित्त्याची दमछाक करणारं हरणही तितकचं चपळ..चित्ता वेगानं जरी धावत असला, तरी हरीण चित्त्यालाही घाम फोडते. चित्ता आणि हरणाच्या रेसचा एक खतरनाक व्हिडीओ एक्सवर व्हायरल झाला आहे. चित्ता हरणाचा शिकार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतो, पण हरीणानेही त्याच्या चपळतेने चित्त्याला मोठं आव्हान दिलं..या दोघांच्या थरारक लढाईत शेवटी कोण जिंकतं? हे तुम्ही या व्हायरल व्हिडीओत नक्की पाहा..

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, जंगलात एक हरण गवत चरण्यासाठी इकडे तिकडे भटकत असतं. त्याचदरम्यान एक चित्ता त्या हरणाला पाहतो. त्यानंतर चित्ता हरणाची शिकार करण्यासाठी खूप वेगानं त्याचा पाठलाग करतो. पण सुरुवातीला हरण चित्त्यापासून खूप दूर असतं. हरण जीवाची बाजी लावून पळत असतं. पण चित्त्याचा वेग त्या हरणाला चकवा देतो. काही सेकंदातच चित्ता त्या हरणाच्या जवळ येतो, त्यानंतर तेच घडतं..जे नियतीत लिहिलेलं असतं. 

नक्की वाचा >> सावधान! समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? मग 'हा' व्हिडीओ एकदा बघाच

चित्त्याने हरणाला कसं हरवलं? इथे पाहा व्हिडीओ

चित्ता थोडाही उशिर न करता, हरणावर झडप घालतो आणि त्याला जमिनीवर पाडतो. हरणाची शिकार केल्यानंतर तो जंगलाच्या राजासारखाच मैदानात बसतो. हरण त्याचा पराभव स्वीकारतो,त्यानंतर चित्ता त्याच्या जबड्याने हरणाची मान मोडतो. हरणाचा आणि चित्त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. @TheeDarkCircle नावाच्या यूजरने हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे.

नक्की वाचा >> Optical illusion Test : फोटोत समुद्रकिनारा दिसतोय? पण तो समुद्र नाही..क्लिक करून नीट बघा!

या व्हिडीओला 82 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चित्त्याचा वेग पाहून लोकांनाही मोठा धक्का बसला.व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका यूजरने कमेंट करत म्हटलंय, हरणाला खूप आधीच सरेंडर करायला हवं होतं. कारण तो चित्त्यापुढं कधीही जिंकू शकत नाही. दूसऱ्या यूजरने म्हटलंय,हरणाबाबत वाईट वाटत आहे. बिचाऱ्या हरणाने जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com