Viral Video : 'भाई थोडासा बहन हो क्या?' ट्रोलिंगला तरुणाचं जबरदस्त प्रत्युत्तर, असा आवाज की प्रेमातच पडाल! 

चिराग हा LGBTQ कम्युनिटीमधील आहे. त्याला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र चिरागच्या सौंदर्याचं आणि आवाजाचं कितीतरी पटीने कौतुक केलं जातं.

जाहिरात
Read Time: 2 mins

Social Media Viral Video : सोशल मीडियावर तसे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र काही व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून जातात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चिराग शर्मा नावाच्या मेकअप आर्टिस्टने शेअर केला आहे. (Chirag Sharma Viral Video) 

चिराग एक मेकअप आर्टिस्ट आणि इन्फ्लूएन्सर आहे. तो मूळचा नेपाळचा आहे. त्याचे व्हिडिओ मिलियन्समध्ये पाहिले जातात. चिराग अनेक सामाजिक विषयांवरही व्हिडिओ पब्लिश करीत असतो. चिराग दिसायला अत्यंत सुंदर असून त्याच्या आवाजाचंही अनेकांकडून मोठं केलं जातं. मात्र त्यांच्या राहणीमानावरुन अनेकदा त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. अशाच एका ट्रोलिंगला चिरागने शाल-जोडे देऊन फटकारलं आहे. त्याच्या या व्हिडिओला एक मिलियनहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर त्याचा हा व्हिडिओ 23.3 मिलियन लोकांनी पाहिला आहे. 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा....

भाई थोडासा बहन हो क्या? ट्रोलिंगला चिरागचं जबरदस्त प्रत्युत्तर
चिराग हा LGBTQ कम्युनिटीमधील आहे. त्यामुळे अनेकदा त्याच्या राहणीमानावरुन तो ट्रोल होतो. त्याला वारंवार 'भाई थोडासा बहन हो क्या? अशी कमेंट केली जाते. यावर चिरागने ट्रोलर्सला जबरदस्त प्रत्युत्तर दिलं आहे. यावर तो म्हणतो, तुझ्या बहीण-भावापेक्षा मी कितीतरी पटीने सुंदर,  प्रतिभावान आहे. आणि माझ्या आवाजाची तुलना तर होऊचं शकत नाही. इतरांना ट्रोल करण्यापेक्षा आधी स्वत:कडे पाहा असंही चिरागने म्हटलं आहे.  तेच तेच कमेंट करण्याऐवजी काहीतरी वेगळं किंवा क्रिएटिव्ह लिहा असंही तो यावेळी म्हणतो. 


 
 

Topics mentioned in this article