Cockroach Coffee Video: मेलेली झुरळं,किड्यांचा भुसा... या कॉफीची चर्चा किंमत ऐकून बसेल 440 व्होल्टचा झटका

Cockroach Coffee Trending Video: कीटकांपासून तयार करण्यात येणाऱ्या कॉफीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Cockroach Coffee Trending Video: कॉकरोच कॉफी पिण्यासाठी कराल का धाडस"
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बीजिंगमधील एका कीटक संग्रहालयाच्या कॅफेमध्ये झुरळांची पावडर मिसळलेली कॉफी विक्रीसाठी उपलब्ध आहे
  • झुरळ सुकवून त्याची बारीक पावडर तयार केली जाते आणि ती कॉफीमध्ये टॉपिंगसाठी वापरली जाते
  • कॉफीची किंमत 45 युआन असून, भारतीय चलनात सुमारे 560 रुपये इतकी आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Viral Coffee Trending Video: सकाळी उठल्यानंतर बहुतांश लोक दिवसाची सुरुवात कॉफी पिऊन करतात. कॉफीच्या सुगंधामुळे ताजेतवाने वाटते. पण जरा कल्पना करा की त्याच कॉफीवर चॉकलेट पावडरऐवजी झुरळं ठेवली तर? ऐकूनच मळमळलं असेल ना. पण बीजिंगमधील कीट थीम असणाऱ्या म्युझिअमधील झुरळाची कॉफी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. व्हिडीओ पाहून लोक कॉफी पिणे सोडण्यास तयार आहेत, पण कॉकरोच कॉफी पिण्याचे कोणाचं धाडस होत नाहीय.  

कॉकरोच कॉफीचा व्हायरल व्हिडीओ  (Cockroach Coffee Trending Video)

scmp ने दिलेल्या वृत्तानुसार, बीजिंगमधील एका प्रसिद्ध कीटक संग्रहालयाने कॉफीच्या दुनियेत एक असा ट्विस्ट आणलाय, ज्याची जगभरात चर्चा सुरू आहे. येथील कॅफेमध्ये कोकरोच कॉफीची विक्री करण्यात येतेय. एक अशी कॉफी ज्यावर कॉकरोच पावडर मिक्स केली जाते आणि आतमध्ये विविध प्रकारच्या कीटकांचा समावेश केला जातो. या कॉफीची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. एक कप कॉकरोच कॉफीची किंमत 45 युआन म्हणजे भारतीय चलनानुसार 560 रुपये इतकी आहे.  

कॉकरोच कॉफी कशी तयार केली जाते? (Cockroach Powder Coffee)

  • कॉफीची रेसिपी ऐकूनही लोकांना धक्का बसतोय.
  • कॉफी तयार करण्यासाठी सर्वप्रथम झुरळं सुकवली जातात.  
  • यानंतर वाटून त्याची बारीक पावडर तयार केली जाते. 
  • कॉफीमध्ये सुकवलेले कीटक मिक्स केले जातात. 
  • कॉफीचं टॉपिंग म्हणून त्यावर कॉकरोच पावडर मिक्स केली जाते. 

(नक्की वाचा: Viral Video: बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही...तरीही पत्नीला ठेवतो राणीसारखं Video पाहून म्हणाल: हेच खरं प्रेम)

चीनमध्ये मिळतेय झुरळांची कॉफी (Weird Coffee Trends)

जे लोक धाडसी आहेत, त्यांनी या कॉफीचा आस्वाद घेतलाय. चेन शी नावाच्या एका ब्लॉगरने डोळे मिटून संपूर्ण एका श्वासात कॉफी संपवलीय आणि म्हटलं की, जितकं वाटलं होतं तितकी चव घाणेरडी नाहीय...पण पुन्हा कॉफी पिणार नाही. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय की, तुम्ही मला पैसे दिले तरीही मी हे पाप करणार नाही. 

Advertisement

(नक्की वाचा: Viral Video: वर्गात जो मूर्ख आहे, त्यानं उभं राहावं; शिक्षिकेच्या कृतीवर विद्यार्थ्यानं भरवर्गात असं काही केलं की...)

कॉफीवर शिंपडला जातो किड्यांची पावडर (Yellow Mealworms Drink)

संबंधित म्युझियमने दावा केलाय की, कॉफीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू पारंपरिक चिनी औषधांच्या (TCM) दुकानांमधून खरेदी केल्या जातात. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)