Viral Video: मुलीकडची मंडळी स्थळ पाहायला जातात, तेव्हा मुलाचं काम आणि त्याच्या कुटुंबीयांचे वर्तन कसे आहे; याची कसून चौकशी करतात. मुलाकडचे लोक मुलीचे वडील त्यांच्या इच्छेनुसार लग्नसोहळा करू शकतील का? भरीव हुंडा देऊ शकतील का? याचा विचार करतात. हुंड्याच्या समस्येमुळे अनेक मुलींचे लग्न होत नाही किंवा कधीकधी मुल स्वतःच मुलींमध्ये दोष शोधतात. एखाद्या मुलीच्या वडिलांनी हुंडा दिला तरीही त्यांची मुलगी सासरी आनंदाने नांदेल, याची काही खात्री नसते. मुलींमध्ये सतत दोष शोधणाऱ्या मुलांनो जरा या तरुणाची कहाणी ऐकाच. बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, अशा तरुणीसोबत एका तरुणाने लग्न केलं. हो तुम्ही वाचताय, ते अगदी खरं आहे.
जगातील सर्वांत आनंदी जोडपं
ऐकू-बोलू न शकणाऱ्या मुलींच्या इच्छा नसतात का? असो... पुढील कहाणी जाणून जाणून घेऊया. विशेष म्हणजे या जोडप्याचा हा प्रेमविवाह देखील नाही. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार या तरुणाने ऐकू-बोलू न शकणाऱ्या मुलीशी लग्न केले. भलेही ती तरुणी पतीशी प्रेमाच्या गोष्टी बोलू शकत नाही किंवा त्याचं म्हणणं त्याला काहीही ऐकू शकणार नाही. पण ती पतीच्या मनातील गोष्टी समजू शकते, त्यांचं दुःख तिला कळते आणि अडचणीमध्ये त्याला साथही देते. या व्हायरल व्हिडीओमध्ये जगातील सर्वात आनंदी विवाहित जोडपे आहे, जे एका बाळाचे आईवडील देखील आहेत. दोघांच्या प्रेमाचे प्रतीक असलेले बाळ तरुणाने आपल्या हातात घेऊन पत्नी शेजारी तो उभा आहे. या सुंदर जोडप्याची कहाणी हेच दर्शवते की एका मुलीला अशाच जोडीदाराची आवश्यकता असते जो तिला मानसिकदृष्ट्या समजून घेईल आणि कायम साथ देईल.
पाहा Video:
This man married a woman who can't speak or hear in an arranged marriage setup.
— ︎ ︎venom (@venom1s) October 27, 2025
They are happy together as a family.
But girls can't even marry a guy who earns less than them or is unemployed.
This is why men are brave.
Respect to this man.
pic.twitter.com/nmmJFfdpHQ
डॉक्टरांनाही आताच्या मुलांची केली कानउघडणी
व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये दोन गोष्टी ठळकपणे मांडण्यात आल्या आहेत. कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "एक पुरुष ऐकू-बोलू न शकणाऱ्या मुलीशी लग्न करू शकतो तेही कुटुंबीयांनी ठरवून दिलेल्या मुलीशी, पण एका मुलीला लग्नासाठी एक योग्य आणि कमावणारा मुलगा हवा असतो. जर एखादी मुलगी या तरुणाच्या जागी असती तर तिने लग्न केले नसतं". व्हिडीओमध्ये डॉक्टर म्हणतायेत की, आजकालची मुलं स्वतःचा चेहरा पाहण्यापूर्वी मुलींमध्ये दोष काढतात, जरा या जोडप्याकडे पाहा आणि प्रेम काय असतं हे शिका.
(नक्की वाचा: Relationship Tips: पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपावं, डावीकडे की उजवीकडे? 99% लोकांना माहीतच नाही ही गोष्ट)
नेटकऱ्यांनी काय म्हटलंय?एका युजरने म्हटलंय की, नाते तेव्हाच मजबूत होऊ शकते की जेव्हा दोन्ही व्यक्ती प्रेमळ, धैर्यशील आणि प्रौढ असतील; भलेही मग ते गरीब असले तरी चालले. दुसऱ्या एकानं लिहिलंय की, यांची कहाणी त्या मुला-मुलींना चपराक आहे, जे कपड्याप्रमाणे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड बदलतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
