सत्तरी ओलांडलेल्या पुरुषाचे महिलेसारखे दिसू लागले स्तन, डॉक्टरही चक्रावले

या वृद्धाला 'गायनेकोमास्टिया' (Gynecomastia) नावाचा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

हृदयविकारावर उपचार घेणाऱ्या एका 76 वर्षीय वृद्धाला अचानक उद्भवलेल्या शारीरिक बदलामुळे धक्का बसला आहे. गेल्या 8 महिन्यांपासून या वृद्धाच्या छातीचा आकार असामान्यपणे वाढत होता आणि तिथे वेदना जाणवत होत्या. वैद्यकीय तपासणीनंतर समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. या वृद्धाला 'गायनेकोमास्टिया' (Gynecomastia) नावाचा आजार झाला असून, त्याचे मुख्य कारण तो गेली अनेक वर्षे घेत असलेले हृदयविकाराचे औषध 'स्पायरोनोलॅक्टोन' (Spironolactone) असल्याचे निष्पन्न झाले आहे.

नक्की वाचा: बेडूक वाचवणार माणसाचा जीव, एका डोसमध्ये कॅन्सरचा नायनाट

गायनेकोमास्टिया म्हणजे काय? (What Is Gynecomastia) 

गायनेकोमास्टिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पुरुषांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. विशेषतः इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकांमध्ये तफावत निर्माण झाल्यामुळे पुरुषांच्या स्तनांच्या ऊतींमध्ये वाढ होते. या 76 वर्षीय रुग्णाबाबतही असेच घडले. गेल्या अनेक वर्षांपासून तो हृदयविकारासाठी औषधोपचार घेत होता, मात्र अचानक 8 महिन्यांपूर्वी त्याला छातीला  सूज  आल्यासारखे वाटू लागले होते.  

नक्की वाचा: पगार, सुट्ट्या आणि पेन्शन... नोकरीचे सर्व नियम बदलणार,वाचा 10 मोठे बदल

औषधाचे दुष्परिणाम

वैद्यकीय अहवालानुसार, स्पायरोनोलॅक्टोन हे औषध उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्यांसाठी अमेरिकेसह जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. एकट्या अमेरिकेत 1.2 कोटींपेक्षा जास्त रुग्ण हे औषध घेतात.  हे औषध शरीरातील पुरुष संप्रेरक म्हणजेच टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करते. जेव्हा शरीरात टेस्टोस्टेरॉन कमी होते, तेव्हा इस्ट्रोजेनचे प्रमाण प्रभावी ठरते आणि पुरुषांमध्ये स्त्रीत्वाची लक्षणे दिसू लागतात. अभ्यासानुसार, हे औषध घेणाऱ्या सुमारे 10% पुरुषांमध्ये असे दुष्परिणाम दिसून येतात. तज्ज्ञांच्या मते, गायनेकोमास्टियाची लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अनेकदा औषधाचा डोस बदलल्यास किंवा पर्यायी औषध सुरू केल्यास ही समस्या दूर होते. मात्र, परिस्थिती गंभीर असल्यास लायपोसक्शन किंवा शस्त्रक्रिया करावी लागते. न्यू इंग्लंड जर्नल ऑप मेडिसिनच्या नियतकालिकामध्ये या केसबद्दलची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

Topics mentioned in this article