जाहिरात

Japani Tree Frog: बेडूक वाचवणार माणसाचा जीव, एका डोसमध्ये कॅन्सरचा नायनाट

Cancer Treatment Research: बेडूक, पाल आणि बरेचशा उभयचर तसेच सरपटणाऱ्या जीवांना कॅन्सरची लागण होत नाही.

Japani Tree Frog: बेडूक वाचवणार माणसाचा जीव, एका डोसमध्ये कॅन्सरचा नायनाट
मुंबई:

कॅन्सरचा समूळ नायनाट करणारे औषध अद्यापही वैज्ञानिक शोधू शकलेले नाहीत. मात्र जपानमधील काही वैज्ञानिकांनी कॅन्सर पूर्णपणे बरा करण्याची क्षणता असलेल्या (Cancer Treatment) औषधाच्या संशोधनात एक मोठी प्रगती केली आहे. जपानी ट्री फ्रॉग ( Japani Tree Frog )च्या आतड्यातील एका विशिष्ट पद्धतीचा बॅक्टेरिया कॅन्सरग्रस्तांवर उपचारासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतो असे वैज्ञानिकांना संशोधनाअंती वाटू लागले आहे. या बॅक्टेरियाचा वापर करून उंदरावर केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, त्याने ट्युमर पूर्णपणे बरा केला. विशेष बाब ही आहे की यामुळे कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. 

नक्की वाचा: एक दोन नव्हे 6 सिहांनी शेतात लावली होती फिल्डिंग..शेतकऱ्याने कॅमेरा झूम करताच घडलं असं काही..

कॅन्सरवर उपचार करण्यासाठी कसे झाले संशोधन?

बेडूक, पाल आणि बरेचशा उभयचर तसेच सरपटणाऱ्या जीवांना कॅन्सरची लागण होत नाही. जपानमधील सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टीट्यूटच्या वैज्ञानिकांना ही बाब माहिती असल्याने त्यांनी या जीवांच्या आतड्यातील बॅक्टेरिया उदरांमध्ये सोडून पाहण्याचा निर्णय घेतला होता. वैज्ञानिकांनी बेडूक, पाल आणि अन्य जीवांच्या आतड्यातील 45 विविध बॅक्टेरिया काढले. यातील 9 बॅक्टेरिया कॅन्सरशी लढण्यासाठी उपयुक्त असल्याचे वैज्ञानिकांना दिसून आले. खासकरून जपानी ट्री फ्रॉगच्या आतडीत मिळालेला बॅक्टेरिया हा कॅन्सरशी लढण्यात अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले. संशोधनात वैज्ञानिकांना असे दिसून आले की हा बॅक्टेरिया ट्युमरवर हल्ला करतो आणि रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत करण्यासाठी मदत करतो. सोबतच तो टी-सेल, बी-सेल आणि न्यूट्रोफिल्स सक्रिय करण्यासही मदत करतो. ट्युमरमध्ये ऑक्सीजन कमी असल्याने केमोथेरपी फार प्रभावी ठरत नाही. मात्र हे बॅक्टेरिया ऑक्सीजन कमी असल्यासही प्रभावीपणे काम करतात. हा बॅक्टेरिया उंदराच्या शरीरात सोडल्यानंतर उंदराचे रक्त लवकर शुद्ध झाले, कोणतेही दुष्पपरिणाम दिसले नाही. यामुळे हा बॅक्टेरिया क्लिनिकल ट्रायलसाठी सुरक्षित पर्याय असल्याचा निष्कर्ष वैज्ञानिकांनी काढला आहे. 

नक्की वाचा: धुरंधर सिनेमात दाखवलेला उजैर बलोच नक्की कोण?'तो' जुना इंटरव्ह्यू पाहून उडेल थरकाप, पाहा Video

संशोधकांसाठी आशेचा किरण निर्माण करणारी बातमी

उंदराच्या शरीरातील ट्युमर बरा करणारा हा बॅक्टेरिया मानवाच्या शरीरात सोडल्यास कसा काम करेल हे सखोल संशोधनानंतरच स्पष्ट होऊ शकेल, विविध प्रकारच्या कॅन्सरशी लढा देण्यासाठी हा बॅक्टेरिया किती उपयोगी पडतो हे देखील तपासणे गरजेचे आहे. हा बॅक्टेरिया आणि अन्य औषधांचे मिश्रण केल्यास त्याचा काय परिणाम होईल हे देखील तपासावे लागणार आहे. मात्र कॅन्सर पूर्णपणे बरा करणाऱ्या औषधांचे संशोधन करणाऱ्यांसाठी ही बातमी आशेचा किरण निर्माण करणारी आहे. TANDFONLINE च्या संकेतस्थळावर या संशोधनाची माहिती देणारा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com